Home राजकीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी दिला राजीनामा; राजकारणात प्रवेश करणार

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी दिला राजीनामा; राजकारणात प्रवेश करणार


कोलकाता-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | उच्च न्यायालयाचे न्यायाधीश थेट राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार आहेत. न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय असे त्यांचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राजीनामा देत असल्याने ते भाजपकडून उमेदवार असतील अशी चर्चा रंगल्या आहेत.

न्यायाधीश गंगोपाध्याय हे सध्या कोलकाता उच्च न्यायालयात आहेत. त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले आहे. रंजन गोगई यांच्यानंतर आणखी एक न्यायाधीश राजकारण येणार आहेत.


Protected Content

Play sound