Home क्राईम वृध्दाच्या घरातून ३ लाख १० हजारांची रोकड लंपास

वृध्दाच्या घरातून ३ लाख १० हजारांची रोकड लंपास


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बनावट चावीच्या मदतीने वृध्दाचे बंद घरातून ३ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील सुसरी गावात दिलीप पंडीत पाटील वय ६२ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी २ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेवून बंद घराचे कूलूप बनावट चावीने उघडून कपाटात ठेवलेले ३ लाख १० हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिलीप पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound