Home राजकीय सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसूरी स्वराज यांना भाजपकडून लोकसभेचे तिकिट

सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसूरी स्वराज यांना भाजपकडून लोकसभेचे तिकिट

0
100


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पाच पैकी चार खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना देखील दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना याआधी भाजपकडून कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी देखील राजकारणात सक्रिय झाली होती. आता त्यांना थेट उमेदवारी मिळाल्याने त्या राजकारणात आणखी सक्रिय होणार आहेत.बांसुरी स्वराज या वकील आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. इंग्रजी साहित्यात त्यांनी बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून बांसुरी यांनी मास्टर्स केले आहे.

 


Protected Content

Play sound