Home Cities पाचोरा आपचे जितेंद्र जैन यांचा शिवसेनेत प्रवेश

आपचे जितेंद्र जैन यांचा शिवसेनेत प्रवेश

0
96

jitendra jain pachora in shivsena

पाचोरा प्रतिनिधी । आम आदमी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र खजिनदार जितेंद्र जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांचे आ. किशोर पाटील यांनी स्वागत केले.

आपचे उत्तर महाराष्ट्र खजिनदार यांनी अलीकडेच पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत जैन यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, गणेश पाटील, अ‍ॅड दिनकर देवरे, नगरसेवक सतीश चेडे, नगरसेवक डॉ भरत पाटील, पप्पू राजपूत, राजू पाटील, योगेश पाथरवट, जितू पेंढारकर, सुमित सावंत, जावेद शेख, खंडू सोनवणे, विजय भोई आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound