तालुका पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिंदी ते मोंढाळे गावाच्या दरम्यान असलेल्या शेताजवळ जुन्या वादातून एकाने दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव राजाराम डहाके (वय-७५, रा. पिशोर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे मयत वृद्धाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सदाशिव डहाके हे वृद्ध व्यक्ती भुसावळ तालुक्यातील मोंढाळे येथील अनिल संतोष धनगर यांच्या शेतातील गोठयात कामाला होते. दरम्यान जुन्या वादातून लक्ष्मण गणेश शिराळे रा. शेलवड ता. बोदवड याने बुधवार १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाटीवर झोपलेल्या सदाशिव राजाराम डहाके या वृद्धाला दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवेठार मानाची धमकी दिली. त्यामुळे जखमी झालेल्या वृद्धाचा झोपलेल्या स्थितीत काटेवरच मृत्यू झाला. हे घटना घडल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून मृतदेह भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. या घटनेप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गणेश शिराळे रा.शेलवड ता. बोदवड यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहे.