भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाने नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत सामाजिक कार्यकर्ते ॲड. विकास महाजन यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली. भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), रवि अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जळकेकर महाराज यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश अशोकराव पाटील यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यात भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.विकास सुरेश महाजन यांची जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली असून या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.