Home क्राईम दुचाकी घसरल्याने जळगावातील दोघे जखमी

दुचाकी घसरल्याने जळगावातील दोघे जखमी


two wheelar apghat

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे दोघे कामानिमित्त डांभुर्णी येथे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीला वाचविण्याच्या नादात दुचाकी घसरल्याने दोघे जखमी झाले. दोघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील वर्डी येथे बहिणीकडे कामानिमित्त कैलास सुरेश पवार (वय-28) व त्याचा मित्र अशोक ईश्वर लहाने (वय-25) दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे दुचाकीने जळगावहून वड्री येथे दुचाकीने जात होते. समोरून आचानकपणे दुचाकीने कट मारल्याने त्याला वाचविण्याच्या नादात दोघांची दुचाकी घसरून रोडच्या खाली नाल्यात गेली. यात दोघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत अद्याप पोलीसात कुठलीही नोंद नाही.


Protected Content

Play sound