Home Cities धरणगाव डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। डाॅ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे खासदार निधीतून सुमारे ३० लाखाचे सभामंडपाचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.आर.एन.महाजन होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, राष्ट्रवादीचे नेते मोहन पाटील सर, सरपंच सविताताई सोनवणे, डाॅ हेडगेवार नगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल वाणी हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन धनराज सोनवणे यांनी केले ,प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील तर आभार उपसरपंच चंदन पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप माळी व कार्यकर्ते ,पदाधिकारी ,डाॅ हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सदस्य, शाम पाटील, संभाजी सोनवणे, मंगला महाजन, शिला देशमाने, स्वाती चौधरी, शितल पवार उपस्थित होते तसेच डाॅ हेडगेवार नगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे उपाध्यक्ष भदाणेसर, सचिव किरण वाणी तसेच मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound