नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीला (शरद पवार गट) वटवृक्ष चिन्ह देण्यात येऊ नये अशी मागणी विहिंपने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. संपूर्ण जगभरातील हिंदूंच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणारी विश्व हिंदू परिषद ही एक सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघटना आहे. हिंदू श्रद्धा, मानबिंदू व हिंदू अस्मितेचे रक्षण संवर्धन करणे स्वाभिमानी समरस राष्ट्रीय भावनेने प्रेरित हिंदू समाज निर्माण करणे हे विश्व हिंदू परिषदेचे मूलभूत कार्य आहे.
आज सेवा हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे हिंदू धर्मातील विविध पंथ, संप्रदायांचे आचार्य, संत, महंत, विचारवंत यांच्या समग्र चिंतनातून गोकुळअष्टमीला 29 ऑगस्ट 1964 रोजी परिषदेची स्थापना झाली तेव्हापासूनच विश्व हिंदू परिषदेचा लोगो हा वटवृक्ष असून सदर लोगो नोंदणीकृत सुद्धा आहे. वटवृक्ष पाहिले की विश्व हिंदू परिषदेची आठवण येते.
8 फेब्रुवारी 2024 रोजी विविध वृत्त माध्यमातून आमच्या शरद पवार यांच्या राजकीय पक्षाने पक्षाचे चिन्ह म्हणून चार वेगवेगळे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक वटवृक्ष असून त्या चिन्हासाठी ते आग्रही आहेत, असे सुद्धा वाचण्यात व ऐकण्यात आले. या आक्षेपपत्राद्वारे आमचे असे म्हणणे आहे की, वटवृक्ष हे चिन्ह वर्षानुवर्षे विश्व हिंदू परिषदेची ओळख असून नोंदणीकृत सुद्धा आहे. त्यामुळे निवडणुकीचे चिन्ह म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला दिले जाऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री ॲड सतीश गोरडे यांनी केली आहे. वडाचं झाड सोडून त्यांनी दुसरं कोणतंही चिन्ह मागितले तर हरकत नाही असे ते म्हणाले.