Home Agri Trends साकेगावात शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याबाबत प्रात्यक्षिके

साकेगावात शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याबाबत प्रात्यक्षिके


साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे कृषि कंपन्यांकडून कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मिनाज शेख , चैताली कुऱ्हे, वैष्णवी पालवे, तनुजा पाटील यांनी शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . तसेच सापळे लावण्याचे फायदे, पद्धत व सापळे लावताना घ्यावयाची काळजी याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री गिरीश नेहेते, श्री मनोज नेहेते, व आदि गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकेसाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ.बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व विशेषज्ञ डॉ. नामदेव धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound