जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतात वेअर हाऊस बांधण्यासाठी ग्राम पंचायतीची परवानगीसाठी पाच हजारांची लाच घेणारा हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय-३३, रा. धानोरा, ता. चोपडा) या ग्रामसेवकाला पाच हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झाली. या कारवाईमुळे गावात एकच खळबळ माजली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील पारगाव येथील शेतात वेअर हाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी मिळावी. म्हणून तक्रारदाराने दीड महिन्यापुर्वी ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. हेमचंद्र दत्तात्र्य सोनवणे (वय ३३, रा. देवगाव, पारगाव, ता. चोपडा) ग्रामसेवकाने परवानगीसाठी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पंचासमळ तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने ग्रामसेवकाला पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, बाळू मराठे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.