भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । तालुक्यातील निंभोरा गावात राहणाऱ्या एका तरुणाला क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याच्या नावाखाली लिंक पाठवून ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड वरून ९७ हजार ८९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली होती. याप्रकरणी अखेर चौकशी अंती भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पवन कुमार पंडित पाटील वय-३७ हे आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील निंभोरे बुद्रुक गावात वास्तव्याला आहे. ते एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते घरी असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून महिलेने फोन केला. इंडसलँड बँकेचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याच्या नावाखाली महिलेने पवनकुमार याला एक लिंक पाठवली. दरम्यान पवनकुमारने दिलेल्या लिंकवर माहिती भरून पाठविली. त्याचवेळी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने अज्ञात महिलेने ९७ हजार ८९८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान चौकशीनंतर अखेर सोमवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.