अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. संमेलनपूर्व होत असलेल्या बालमेळाव्याच्या निमित्ताने चिमुकलेही पुढे सरसावले आहेत. बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी अमळनेर शहरातील काही चिमुकले शाळा व खासगी क्लासेसमध्ये जावून विद्यार्थ्यांना आवाहन करत आहेत.
इयत्ता ७ वीच्या विद्यार्थीनी नेहा राकेश पाटील, हिमानी मिलिंद पाटील, मृणल पंकज पाटील, रीचल संदेश पाटील यांच्यासह इयत्ता ११ वीचे विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील, चंदन भिका चौधरी, अभय साहेबराव सोनवणे, रितेश विवेक भामरे, जतिन आनंद शेळके या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य संमेलन व बालमेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी शाळांमध्ये जावून विद्यार्थी व शिक्षकांच्या भेटी घेतल्या.
विद्यार्थ्यांच्या या भुमिकेचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, मुख्याध्यापक बी.एस.पाटील, सीमा सूर्यवंशी, अनिता बोरसे, सुनिल पाटील, मनोहर महाजन यांच्यासह सर्वच शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतूक केले आहे. यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या विद्यार्थ्यांना भैय्यासाहेब मगर व मराठी वाड्मय मंडळ संचालकांचे मार्गदर्शन लाभत आहे.