जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आझाद हिंद एक्सप्रेसने हावडा ते अहमदनगर असा प्रवास करत असतांना जळगाव रेल्वे स्टेशन आल्यानंतर २३ वर्षीय महिला ही बेपत्ता झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जस्मिन जियारुल शेख (वय-२३), रा. सय्यद नगर, ता. जामखेड जि. अहमदनगर असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जस्मिन जियारुल शेख या महिला आपल्या परिवारासह आझाद हिंद एक्सप्रेसने हावडा ते अहमदनगर असा प्रवास करत होत्या. १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे उभी असतांना जस्मिन जियारुल शेख या महिला अचानक बेपत्ता झाल्या. त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्यांची कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांचे नातेवाईक शेख मोनिरुल इस्लाम (वय-२३), रा. भिलपुरा पोलीस चौकी, जवळ शनिपेठ जळगाव यांनी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यानुसार रेल्वे पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सचिनकुमार जगदीश भावसार हे करीत आहे. सदर महिला मिळून आल्यास रेल्वे पोलीस चौकी जळगाव येथे संपर्क करण्याचे नागरिकांना आवाहन रेल्वे पोलीस जळगाव यांचे मार्फतीने करण्यात येत आहे