Home Cities जळगाव शिवतीर्थ मैदानात भव्य श्रीराम कथेचे आयोजन

शिवतीर्थ मैदानात भव्य श्रीराम कथेचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण जगाला व देशाला ज्या आनंद व मंगलमय क्षणाची आतुरता होती अश्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपण होत आहे. या अनुषंगाने आ.राजूमामा भोळे यांच्यावतीन शहरातील शिवतीर्थ मैदानात चिमुकले राम मंदीराचे परमपुज्य दादा महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार आहे.

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम रामकथेचे आयोजन २० ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान जी.एस. शिवतिर्थ मैदान येथे दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. चिमुकले राम मंदिराचे परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार आहे. या भव्य श्रीराम कथेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील आ. सुरेश भोळे (राजूमामा), भाजपा जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.

जळगाव शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित राहून प्रभू श्रीराम कथेचे लाभ घेऊन आपल्या जीवन सार्थक करावे असे आव्हान आयोजक सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound