पुर्णाड फाट्याजवळ नागरीकांचे रास्ता रोको आंदोलन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील पुर्णाड फाट्याजवळ नागरीकांसह व्यावसायिकांचे विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन आज करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ उड्डाणपुलाची गरज नसतांना बांधण्यात येत आहे. याठिकाणी अनेकजण आपला व्यावसाय करत आहे. दरम्यान याठिकाणी उड्डाणपुल झाल्यास अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. उड्डाणपुलाऐवजी सर्कल करण्यात यावे अश्या विविध मागण्यांसाठी स्थानिक नागरीकांसह येथील व्यावसायिकांना आज पुर्णाड फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Protected Content