मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील बंधार्यांसाठी दहा कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील एकूण १७ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधारे योजनांना १० कोटी रू. भरघोस निधीसह प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या माध्यमातून आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश आलेले आहे. मतदार संघातील मंजूर १७ ग्रेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधारे शेतकरी बांधवांसाठी संजवनी ठरणार असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१ (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ निर्णय क्र. गे. सा.बं./प्र.मा./प्र.क्र. ६६८० / २५९४ दिनांक : १२ डिसेंबर, २०२३ अन्वये सदरील कामांना प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
खालील १७ गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधार्यांसाठी १० कोटी निधी सह प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
१) हिवरे-१ ता.मुक्ताईनगर
२) हिवरे-२ ता.मुक्ताईनगर
३) पारंबी ता.मुक्ताईनगर
४) धुळे-३ ता.मुक्ताईनगर
५) धुळे-४ ता.मुक्ताईनगर
६) हलखेडे-२ ता.मुक्ताईनगर
७) बोरखेडा ता.मुक्ताईनगर
८) बोदवड ७ ता.मुक्ताईनगर
९) राजुरा २ ता.मुक्ताईनगर
१०) राजुरा १ ता.मुक्ताईनगर
११) राजुरा ३ ता.मुक्ताईनगर
१२) हलखेडे १ ता.मुक्ताईनगर
१३) बोदवड ६ ता.मुक्ताईनगर
१४) शेळवड क्र. ८ ता. बोदवड
१५) शेळवड क्र.९ ता. बोदवड
१६) जुनोने क्र. ६ ता. बोदवड
१७) शेळवड क्र. ७ ता. बोदवड