प्रभू श्रीरामांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या आव्हाडला अटक करा; हिंदू-गोरक्षकाची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समस्त हिेंदू समाजाचा मन दुखवणाऱ्या जितेंद्र आव्हाडवर गुन्हा नोंदवा असे निवेदन समस्त हिंदु संघटना गोरक्षकांकडून पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

‘देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांनी वनवासात असतांना शिकार करुन मांसाहार केले असे वादग्रस्त विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, आमदारकी रद्द करावी, अगोदरच येवढा संघर्ष करून राम मंदिर मिळाले आता प्रभु विराजमान होणार आणि असे वक्तव्य करणाऱ्या तू

देवांच्या काळात तू बघायला गेला होता का जो आपल्या आईला एकेरी भाषेत बोलतो तो कसा असेल’ असे मनोगत भुषण महाजन व रोहित महाले यांनी केले. लवकरात लवकर याच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास देशभरातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहरातील हिंन्दु बांधवांकडून देण्यात आला.

 

Protected Content