Home धर्म-समाज रवींद्र हरणे महाराज यांना अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

रवींद्र हरणे महाराज यांना अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तीर्थक्षेत्र आदिशक्ती मुक्ताई संस्थांचे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. श्री. रवींद्र हरणे महाराज यांना प्रभू श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्यातर्फे विशेष निमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री योगेशजी गर्गे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे देण्यात आली.

निमंत्रण पत्रिका श्री संत मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक श्री उद्धवराव जुनारे महाराज यांनी स्विकारली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत सहमंत्री ललित चौधरी, बाळासाहेब नागरे, कबउमवि सिनेट सदस्य दिनेश चव्हाण, राजेश पाटील, अजय काठोके, ज्ञानेश्वर हरणे आदि उपस्थित होते. यावेळी संस्थान तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर ट्रस्ट समितीचे आभारही मानले आहेत.


Protected Content

Play sound