Home Cities यावल कामगार पोलीस पाटील संघटनाच्या तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड

कामगार पोलीस पाटील संघटनाच्या तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची बैठक यावल सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सर्वसाधारण वार्षिक बैठक दिनांक १ जानेवारी २o२४ रोजी  गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाच्या तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात येऊन पोलीस पाटील संघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची तर यावल तालुका उपाध्यक्षपदी विशाल जवरे, तालुका सचिवपदी राजरत्न आढाळे,  यांची निवड करण्यात आली असुन, तालुका संघटकपदी हरीश चौधरी, तालुका कार्याध्यक्ष पंकज बडगुजर, महिला तालुका उपाध्यक्षपदी रेखा सोनवणे, प्रसिद्धी प्रमुखपदी चंदन पाटील, जेष्ठ मार्गदर्शक म्हणुन मनोज देशमुख व प्रवीण पाटील, सदस्यपदी दिनेश बाविस्कर, मुक्ताताई गोसावी, सरिता तडवी, किरण पाटील, प्रमोद तावडे, महेमुद तडवी, राकेश साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तसेच या बैठकीत जिल्हापदाधिकारी म्हणून माधुरी राजपूत व पंकज वारके यांची निवड संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी बैठकीला जिल्हाकार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी, जिल्हासंघटक सुरेश खैरनार, प्रफुल्ला चौधरी, जेष्ठ पोलीस पाटील, दिलीप पाटील, प्रसन्नकुमार पाटील, नसीमाताई तडवी उमेश पाटील, संतोष सुरवाडे, शारदा महाजन, दीपक पाटील, विठ्ठल कोळी, अर्चना पाटील, सुनील बारेला, लक्ष्मण लोखंडे, विकास बोदडे, चेतन सोनवणे  उपस्थित होते. नवनिर्वाचित तालुका संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत व नवीनच निवड झालेले पोलीस पाटील बंधू आणि भगिनींचा सत्कार समारंभ बैठकीत संपन्न झाला. याप्रसंगी सभेचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष  पवन चौधरी यांनी केले तर सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका सचिव राजरत्न आढाळे  यांनी केले.


Protected Content

Play sound