Home क्रीडा धनुर्विद्या स्पर्धेतील यशवंत हर्षल चौधरीचा सत्कार

धनुर्विद्या स्पर्धेतील यशवंत हर्षल चौधरीचा सत्कार


सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील हर्षल ईश्‍वर चौधरी या विद्यार्थ्यांना आर्चरी स्पर्धेत यश संपादन केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

सावदा येथील शालेय विद्यार्थी चि. हर्षल ईश्वर चौधरी याने नुकतीच गुजरात येथे संपन्न झालेल्या धनुर्विद्या (आर्चरी) राष्ट्रीय स्पर्धेत विशेष यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानिमित्त मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चि.हर्षल चे अभिनंदन करीत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत स्पर्धा व सरावांतर्गत समस्यान विषयक चर्चा केली

याप्रसंगी, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे निवास्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी फैजपूर येथील माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, प्लांट इरिगेशन चे मालक भूपेंद्र सोनवणे मुक्ताईनगर येथील दिलीप चोपडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound