अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीसाठी मुदतवाढ

scholarship

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी/विद्यालय/महाविद्यालय स्तरावरील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज स्क्रुटीनी करणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर 30 जुन, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज पडताळणीसाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक यांना कळविण्यात आले आहे की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-2019 शैक्षणिक वर्षापासून https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी पोर्टल विकसीत करण्यात आले. सर्व विद्यालय/महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज पडताळणी करण्याची कार्यवाही करावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

 

ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वीच अर्ज भरलेले आहेत व महाविद्यालयाकडून स्क्रुटीनी करण्यात आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर Voucher redeem करणे बाबत मॅसेज आले असतील. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीन मधुन Voucher redeem करणेबाबत तसेच त्रुटीच्या पुर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करुन पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. अर्ज स्क्रुटीनी करतांना काही तांत्रिक अडचण येत असल्यास महाडिबीटी पोर्टल वरील Grievance / Suggestions या पर्यायामध्ये येणाऱ्या अडचणीची तात्काळ नोंद करावी व त्याचा Ticket Number सह प्रकल्प कार्यालयास अवगत करावा. जेणेकरुन महाडीबीटी चे कर्मचारी सदर अडचणी सोडवू शकतील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी व महाविद्यालयाच्या नोटीसबोर्डवरही सुचना लावण्यात यावी.
अनुसूचित जमातीचा विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास यास प्राचार्य / मुख्याध्यापक सर्वस्वी जबाबदार राहतील. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती विनीता सोनवणे यांनी कळविले आहे.

Protected Content