जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | डॉ. केतकी ताई पाटील फाउंडेशन आणि R STREAMING यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअप चे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील गोदावरी आय एम् आर महाविद्यालयात २६ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केसांवर फुगे फेम सचिन कुमावत हे असणार आहे. अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील ह्या राहणार आहे.
पहिल्यांदाच हा उपक्रम होत असून यात सोशल मीडिया वर ॲक्टिव असणाऱ्या कलावंताचा सत्कार केला जाणार आहे तसेच त्यांना चित्रपटाविषयी मार्गदर्शन ही केले जाणार असल्याची माहिती R STREAMING चे डायरेक्टर गौरव नाथ यांनी दिली.