मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपत असतांनाच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत क्युरेशन पिटीशन स्वीकारली असून यावर २४ जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई विनोद पाटील हे लढत आहेत. त्यांनी आज या लढ्यातील एक प्रमुख अपडेट दिली आहे. यानुसार, मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. तसेच येत्या २४ जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट ही पिटीशन सबमिट करून घेतल्याची बाब ही दिलासादायक मानली जात आहे. या माध्यमातून आता सुनावणीत आणि नंतर निकालातून काय निर्देश येणार ? यावरून मराठा आरक्षणाची दिशा ठरणार आहे.