Home धर्म-समाज इस्कॉनच्या हरे कृष्ण संकीर्तन पदयात्रेचे मुक्ताईनगरात स्वागत

इस्कॉनच्या हरे कृष्ण संकीर्तन पदयात्रेचे मुक्ताईनगरात स्वागत


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इस्कॉन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम संस्थेच्या वतीने आयोजीत हरे कृष्ण संकीर्तन यात्रेचे मुक्ताईनगरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

इस्कॉन तर्फे आयोजित हरे कृष्ण संकीर्तन महाराष्ट्र पदयात्रा पंढरपूरहून गेल्या चार वर्षांपासून निघाली आहे. महाराष्ट्रातील गावागावात जावून गीता भागवत व हरीनामाचा व आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार करीत आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काल दुपारी १२ वाजता या पदयात्रेचे आपल्या मुक्ताईनगर मध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे. या पदयात्रेत देश विदेशातील भक्त सुद्धा सहभागी आहेत.

दरम्यान, शनिवार दिनांक २३ रोजी गिता जयंती निमीत्त सकाळी १० ते १२ वा संपूर्ण गीतापठण चे नामदेव नगर येथे हरे कृष्ण भक्तांद्वारे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व भावीक भक्तांनी यात सहभागी होवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे इस्कॉन तर्फे आवाहन करण्यात आले आहे. तर, दर शनिवारी संध्या. ७.०० ते ८.३० या वेळेत श्रीराम मंदिर येथे घेण्यात येतो त्याठिकाणी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound