भरधाव ट्रकची “बस”ला धडक; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात बस जात असताना बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १९ सीएक्स ९४९) याने जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर बसचालकाने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content