


धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लाडली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी घडल्याची घटना गुरूवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता परस्परविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादीत ईश्वरलाल भागवत पाटील (वय-४७, रा. लाडली ता.धरणगाव) यांनी म्हटले आहे की, गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांड्याच्या कारणावरून प्रल्हाद नामदेव पाटील जयेश प्रल्हाद पाटील, गजानन प्रताप पाटील, नितीन निंबा पाटील, राकेश निंबा पाटील आणि अमोल नामदेव पाटील सर्व रा. लाडली ता.धरणगाव या सर्वांनी ईश्वरलाल पाटील आणि त्यांच्या घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ करत “आज सर्वांना बाहेर काढा आणि यांना सोडू नका” असे बोलून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तर याच घटनेतील दुसऱ्या फिर्यादीत प्रल्हाद नामदेव पाटील यांनी म्हटले आहे की, गुरुवार 21 डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून ईश्वर भागवत पाटील, सतीश भागवत पाटील, ऋषिकेश ईश्वर पाटील, मीराबाई ईश्वर पाटील आणि छकुली सतीश पाटील सर्व रा. लाडली ता.धरणगाव या सर्वांनी प्रल्हाद पाटील आणि त्याचा मुलगा जयेश यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली या घटनेबाबत अखेर धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता परस्पर विरोधात दोन्ही गटातील एकुण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पाटील हे करीत आहे.



