Home Cities जळगाव यश नगरातून महिलेची दुचाकी लांबविली

यश नगरातून महिलेची दुचाकी लांबविली


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील यश नगरातून एका महिलेची दुचाकी घरासमोरून चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवार १३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेखा नितीन जाधव (वय-३७) रा.यश नगर पिंप्राळा जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका शाळेत त्या शिपाई म्हणून नोकरीला आहेत. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ ईडी ८४२५) ही त्यांच्या घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवार १३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले. दरम्यान त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.


Protected Content

Play sound