Home क्राईम सार्वजनिक शौचालयातील फायबरच्या ६ पाण्याच्या टाक्यांची चोरी

सार्वजनिक शौचालयातील फायबरच्या ६ पाण्याच्या टाक्यांची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरात महानगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालय येथून फायबरच्या ६ पाण्याच्या टाक्यांची चोरी केल्याचे ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आले होते. याप्रकरणी अखेर बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक १७ मधील श्रीकृष्ण नगरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या ठिकाणी फायबरच्या ६ पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी ह्या पाण्याच्या टाक्या चोरून  नेल्याचे ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या टाक्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोलीस नाईक किरण वानखेडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound