जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वडदोरा येथील पारूल विद्यापिठ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नर्सिंग फिस्ट २०२३ अवयवदान नाटय स्पर्धा, शिवतांडव नृत्य, फॅशन शो या तिन्ही स्पर्धेत प्रथम पारितोषीकाचे मानकरी ठरत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने तिहेरी यश मिळवले आहे.
या स्पर्धेत संपुर्ण भारतातील नर्सिंग महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वरील तिन्ही प्रकारातील स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी, पदविका, आणि डिप्लोमामधील विद्यार्थ्यांनी प्रा. निर्भय मोहोड, प्रा मोनाली बारसागडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन महिन्यापासून अथक परिश्रम घेत असल्याने अवयवदान तसेच शिवतांडव, आणि फॅशन शो या विषयावर विशिष्ट पध्दतीने सादरीकरण केले आणि अथक परिश्रमातून बाजी मारली.
आपल्या वैशिष्टयपुर्ण सादरीकरणात परिक्षकासह संपुर्ण भारतातून आलेल्या स्पर्धक व प्रेक्षक यांचे लक्ष वेधून घेत अत्यंत कलात्मक पध्दतीने अवयवदानाबाबत जनजागृती तसेच शिवतांडव अतिउकृष्ट नृत्यातून मानकरी म्हणून पात्र ठरले. पारूल विद्यापिठाचे प्रा. स्वप्निल रहाणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला.
पारूल विद्यापिठातील नर्सिंग अधिष्टाता डॉ. रविंद्र एच. एन.यांनी यांच्या हस्ते प्रथम विजेता म्हणून स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विदयार्थ्यांना गौरवण्यात आले. विदयार्थ्यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील सदस्य गोदावरी फॉउंडेशन यांचेसह प्राचार्य विशाखा गणविर,प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी शिक्षक व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशाबददल महाविद्यालयात जल्लोष करण्यात आला या यशामधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला संपुर्ण भारतात नवीन ओळख प्राप्त झाली असून शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.