जळगावातील कार चोर सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

car chori news

जळगाव प्रतिनिधी । दारासमोर पार्किंग केलेली स्विफ्ट डिझायर कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. कार चोरून घेवून जातांना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कैलास लख्मीचंद चिमणानी (वय-45) रा. टी.एम.नगर, सिंधी कॉलनी हे केसांच्या तेलाचे व्यापारी आहे. नेहमीप्रमाणे 25 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वाजता कामावरून स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच 19 बीयू 2123) ने आले. घरासमोर चार पार्किंग करून रात्री 10.30 वाजता जेवण करून परीवारासह झोपले. दुसऱ्या दिवशी 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता जागेवर कार मिळून आली नाही. दरम्यान घरासमोर राहणारे शिवम जाधवानी यांच्या घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 26 रोजीच्या पहाटे 3 वाजून 18 मिनीटांनी अज्ञात चोरट्यांनी कार चोरून राष्ट्रीय महामार्गाकडे जात असतांना दिसून आली. कैलास चिमणानी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

 

Protected Content