जळगावच्या नाट्य परिषद शाखेचे जबरीने मुक्ताईनगर शाखेत विलनीकरण (व्हिडीओ)

download 5

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या एकतर्फी निर्णयामुळे अ.भा. नाट्य परिषद जळगाव शाखेचे असित्त्वच धोक्यात आले आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर जळगाव शाखेचे विलीनीकरण मुक्ताईनगर शाखेत केले गेले आहे. जिल्हास्तर शाखेचे तालुकास्तर शाखेत विलिनीकरण करण्याचा हा अजब प्रकार केला असल्याचा आरोप जळगाव शाखेच्या वतीने आज (दि.१८) पत्रपरिषदेत करण्यात आला. या पत्रपरिषदेत रमेश भोळे, नितीन देशमुख, अरविंद देशपांडे, पियुष रावळ, अमोल ठाकुर यांनी संबोधीत केले.

 

पत्र परिषदेस संबोधीत करतांना जळगाव शाखा ही १९९५ पासून स्थापन झाली आहे. २०१६ पासून शाखेचे कार्य करण्यासाठी क्रियशील सभासदांनी एकत्र येवून काम करण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये शाखेचे सभासदांनी एकत्र येवून वार्षिक सर्व साधारण सभा घेतली व त्यात सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. ६ एप्रिल २०१९ रोजी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली. त्यात नविन कार्यकारणी निवडण्यात आली. २६ एप्रिल रोजी ५६ सभासदांची यादी व मध्यवर्ती शाखेस देय असलेली प्रति सभासद रक्कम १७६ प्रमाणे ९ हजार ८५६ रुपये एनईएफटीव्दारे पाठवले आहेत. जळगाव शाखेचे जुने व नवे मिळून ३५८ नोंदणीकृत सभासद आहेत. २७ मार्च २०१९ रोजी मध्यवर्ती शाखेने जळगाव शाखेला प्रथमच जळगाव शाखेची मान्यता रद्द करणेबाबतची अंतिम नोटीस पाठवली. या नोटीसीला ७ एप्रिल रोजी उत्तर व वार्षिक सर्वसाधारण सभेचा २०१९ चा अहवाल मुदतीत सादर केला आहे. तसेच ही शाखा मुक्ताईनगर शाखेला वर्ग करण्यात येवू नये याबाबत आवाहन केलेले आहे. परंतु त्यास मध्यवर्ती शाखेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यापुर्वी फैजपुर शाखेचे अशाचप्रकारे जळगाव शाखेत विलीनीकरण करण्यात आले होते. फैजपूर शाखेचे पदाधिकारी अद्याप पावेतो याबद्दल अनभिज्ञ होते.
जळगाव शाखेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जळगाव मनपा आयुक्त असतील, असा निर्णय जळगाव शाखेने घेतला असून राज्यात असा पहिलाच निर्णय झाला गेला. अ.भा. नाट्य परिषद मुंबई ही पालक संस्था असून त्यांनी पालकाप्रमाणे वागावे. नाशिकचे सुनिल ढगे हे मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य असून त्यांनीच वैयक्तीक फोन करुन या विलीनीकरणाची माहिती दिली. जळगाव शाखा विलीनीकरण करण्याचे षडयंत्र पाच ते सहा महिन्यांपासून सुरु होते. मुक्ताईनगर शाखेचे कोणतेही विशेष कार्य नसतांना जळगाव शाखेचे त्यात विलीनीकरण का ? अशी शंकाही यावेळी व्यक्त व्यक्त करण्यात आली.

 

Protected Content