Home Cities यावल यावल तालुका भाजपा तालुकाध्यक्षपदी उमेश फेगडे यांची फेरनिवड

यावल तालुका भाजपा तालुकाध्यक्षपदी उमेश फेगडे यांची फेरनिवड

0
67


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत येत्या काळातील होवु घातलेल्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांची पक्षाच्या यावल तालुकाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे.

राज्यात येणाऱ्या आगामी काळात होवु घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष  अमोल जावळे यांनी यावल येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी पक्षाची धुरा सांभाळतांना आपल्या मागील कार्यकाळात फेगडे यांनी पक्षासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल घेत त्यांची पुनश्च त्यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.

उमेश फेगडे यांच्या निवडीचे मंत्री ना. गिरीष महाजन, खा. रक्षा खडसे , लोकसभा निवडणुकीचे प्रभारी नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, उपाध्यक्ष शरद महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, सविता भालेराव, डॉ. कुंदन फेगडे, राकेश फेगडे व तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे .


Protected Content

Play sound