यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महा परिनिर्वाणर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील पक्ष संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले तर याप्रसंगी बोडडे नाना, सारंग अडकमोल यांनी बुद्धवंदना त्रीशरण, पंचशीलचे सामूहिक पठण केले.
याप्रसंगी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील सामाजिक न्यायाचे जिल्हा उपाध्यक्ष सारंग अडकमोल, आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष एम बी तडवी ललित पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न पाटील, राष्ट्रवादीचे यावल शहराचे कार्याध्यक्ष मोहसीन खान, नानाजी पाटील, दीपक तडवी, अॅड निवृत्ती पाटील,पितांबर महाजन, अमोल पाटील, जाहिद कुरेशी, शेख जुनेद, शरीफ तडवी आदी उपस्थित होते.