मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जी .जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील खेळाडू भाग्यश्री कृष्णा सोनी ( एफ. वाय. बी. ए ) हिची कुस्ती फ्री स्टाईल महिला स्पर्धेसाठी 65 किलो वजन गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड झाली.
सदर आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धा या चंदीगड विद्यापीठ मोहाली, येथे दिनांक 28 नोव्हेंबर ते 1डिसेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. भाग्यश्री कृष्णा सोनी हिला क्रीडा संचालक डॉ.प्रतिभा ढाके व अजय तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा एडवोकेट रोहिणी ताई खडसे खेवलकर, उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी, सचिव मा. श्री सी.एस दादा चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एच. ए .महाजन, उपप्राचार्य डॉ.ए. पी. पाटील, उपप्राचार्य मा.आ. टी चौधरी तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.