जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बार्शी – सोलापूर येथे १९ वर्षा आतील मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी डॉ अण्णासाहेब जी. डी. बेंडाळेची खेळाडू कृपा बाविस्कर ही निवड चाचणी साठी गेली असता एकूण ४२ विद्यार्थिनी मधून अंतिम १२ खेळाडू ची निवड करण्यात आली असून त्यात तीचा ८वा क्रमांक होता.
राष्ट्रीय स्पर्धा माहे डिसेंबर मध्ये बंगळूरू येथे होणार आहे. राष्ट्रीय व्हॉलीबॉल शालेय स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याच्या संघात प्रथमतः जळगाव च्या महिला खेळाडूचा समावेश झाल्याने त्याचा गौरव पासिंग वॉलीबॉल असोसिएशन तर्फे नूतन मराठा कॉलेजच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षिका व जिल्हा संघटनेच्या सचिव शिवछत्रपती अवार्डी अंजली पाटील, उपाध्यक्ष मंजुषा भिडे,डॉ अण्णासाहेब बेंडाले कॉलेज च्या क्रीडा संचालिका प्रा. डॉ. अनिता कोल्हे, भाऊसाहेब पाटील सह जिल्ह्यातील व्हॉलीबॉल चे खेळाडू आदींची उपस्थिती होती.