Home क्राईम शार्टसर्कीटमुळे दुचाकीला आग; मध्यरात्रीची घटना

शार्टसर्कीटमुळे दुचाकीला आग; मध्यरात्रीची घटना


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आगाखान परिसरात शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत दुचाकी जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील आगाखान परिसरात इमरान शेख सईद कुरेशी वय-३० हे आपल्या कुटुंबासह वासतव्याला आहे. त्यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्कींगला लावलेली होती. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे अचानक दुचाकीला आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्याने आग विझविली. परंतू या आगीत दुचाकीचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound