जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा विश्रामगृहाजवळ मुख्य रस्त्यावर फळांची हातगाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर कारवाई करत रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोकॉ रमेश दशरथ अहिरे व पोहेकॉ प्रशांत पाठक हे शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना जिल्हाधिकारी बंगल्यासमोर अजिंठा विश्रामगृहाजवळ मुख्य रस्त्यावर आमीन शाह युसूफ शाह (३३, रा. शिरसोली नाक्याजवळ) हा फळ विक्रीची हातगाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी रमेश अहिरे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आमीन शाह युसूफ शाह यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.




