यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे आज तालुक्यात आगमन होत आहे.
श्रीक्षेत्र वेरूळ (खुलताबाद) जि. छत्रपती संभाजी नगर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी ) महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र नासिक तपोवन कुंभमेळा मैदान या ठिकाणी दिनांक १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्याना जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या भक्त फेरी निमित्त जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजेला यावल तालुक्यातील सांगवी खुर्द (माय सांगवी) येथे आगमन होणार आहे. आज सायंकाळी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची सांगवी खुर्द गावातून शोभायात्रा काढण्यात येणार असून नंतर महाराजांचे प्रवचन होणार आहे.
महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांचा यावल येथील प्रसिद्ध महर्षी श्री व्यास मंदिरात मुक्काम असणार आहे. तर, रविवारी सकाळी महर्षी व्यास व श्रीराम मंदिर मंगल कार्यालय येथे सकाळी ५ ते ८ वाजे पर्यंत परमपूज्य जनार्दन स्वामींची नित्यनेम विधी आरती व परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रवचन येणार आहे. त्यानंतर महाराजांचे पुढील कार्यक्रमाकडे प्रस्थान होणार आहे.
पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जय बाबाजी भक्त परिवार यावल तालुका तर्फे करण्यात आले आहे.