भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीत जुन्या वादातून एका व्यापऱ्याला शिवीगाळ व मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी बुधवारी १५ नोव्हेबर रोजी दुपारी २ वाजून ७ मिनीटांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भागवत आत्माराम सावकारे (वय-४५) रा. आनंद नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापारीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आत्माराम सावकारे हे शहरातील सिंधी कॉलनीतून घरी जात असतांना संशयित आरोपी दिलीप मोहन ठाकूर आणि कुणाल नितीन ठाकूर दोन्ही रा. भुसावळ यांनी व्यापाऱ्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. तर जीवेठार मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी आत्माराम सावकारे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी दिलीप मोहन ठाकूर आणि कुणाल नितीन ठाकूर दोन्ही रा. भुसावळ या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहे.