Home क्राईम उभ्या ट्रॅक्टरला पेटविण्याचा प्रयत्न; शेतकऱ्याचे नुकसान

उभ्या ट्रॅक्टरला पेटविण्याचा प्रयत्न; शेतकऱ्याचे नुकसान


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आडगाव शिवारातील मोकळ्या जागेवर लावलेले उभे ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यात शेतकऱ्याचे २० ते २५ हजारांचे नुकसान झाले असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव येथील रहिवाशी शेतकरी अनिल मधुकर पाटील यांचे गावातच शिवारातील मनुदेवी रस्त्यावरील शेत समोरील उभे असलेले महीन्द्रा जिओ कंपनीचे क्रमांक (एमएच १९ सीजे १४९८) ट्रॅक्टर शेतमालाचे वाहतुक करणारे वाहन गोडाऊन समोर मोकळ्या जागेवर उभे केले होते. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टरच्या टायरला आग लावून दिली. यात शेतकऱ्याचे २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ वासूदेव मराठे करीत आहे.

 


Protected Content

Play sound