Home क्राईम क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

0
42

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रसलपूर येथे नळाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्पतर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

या बाबत वृत्त असे की रसलपुर येथे नळाचे पाणी रस्त्यावर वाहत येत होते.ते पाणी गटारीत वळवीण्याच्या कारणावरुन शेख गुलजार शेख हारून आणि नसीर खान रहेमतुला खान यांच्या गटात लोखंडी पाईप विळ्या लाठ्या काठ्याच्या साहायने जोरदार हाणामारी झाली ही घटना दि १३ च्या रात्री घडली.

या बाबत रावेर पोलिस स्टेशनला दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने दोन्ही गटाच्या सोळा लोकांच्या विरुध्द दंगलीचा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हेड कॉस्टेबल सतीश सानप करीत आहेत.


Protected Content

Play sound