Home क्राईम परप्रांतीय तरूणाने मृत्यूला कवटाळले; कारण अस्पष्ट

परप्रांतीय तरूणाने मृत्यूला कवटाळले; कारण अस्पष्ट

0
117


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षीय तरूणाने हनुमान नगरात राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल कुंजबिहारी पांडे (वय-२६) रा. बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) ह.मु. हनुमान नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी विशाल पांडे हा गेल्या दीड वर्षांपासून हनुमान नगरात भाड्याच्या खोलीत राहत होता. एका कंपनीत खासगी वाहन चालक म्हणून नोकरीला होता. एकीकडे दिवाळीचा सण साजरा होत असतांना दुसरीकडे विशाल पांडे याने रविवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. शेजारी राहणारा त्याचा नातेवाईक चेतनच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ. विकास सातदिवे आणि पोकॉ राकेश बच्छाव करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.


Protected Content

Play sound