धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राहत्या घरात विषारी औषध घेतलेल्या धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदी करण्यात आली आहे. गयभू दरशथ कोळी (वय-६०) रा. बोरखेडा ता. धरणगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, गयभू कोळी हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध घेतले होते. त्यामुळे त्यांना चक्कर येवून पडले होते. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्याानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना दुपारी अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.