Home क्राईम उसनवारीच्या पैशांवरून तरूणावर चाकूने वार

उसनवारीच्या पैशांवरून तरूणावर चाकूने वार


जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुर येथील दिनेश पेट्रोल पंपासमोर उसनवारीचे पैसे घेण्याच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले, तसेच सोबत असलेला मोबाईल देखील फोडून नुकसान केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की रईस सरदार खाटीक (वय-३८) रा. फत्तेपूर ता.जामनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उसनवारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून सादिक रब्बानी शहा, रब्बानी बशीर शहा, आलिम शहा बशीर शहा आणि आबित अमित कुरेशी सर्व राहणार फत्तेपुर ता.जामनेर या चौघांनी शिवीगाळ करत जीवेठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने वार करून गंभीर खापत केली. तसेच रईस खाटीक याचा मोबाईल फोडून नुकसान केल्याचे घटना घडली.  हा प्रकार घडल्यानंतर रईस खाटीक यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.


Protected Content

Play sound