हुडको भागातील बंद घरातून रोकडसह दागिने लांबविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील हुडको कॉलनी परिसरात वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड असा १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवार ७ नोव्हेंबर दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिवदास दौलत पाटील (वय-६७) रा. हुडको कॉलनी भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कामाच्यानिमित्ताने घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र माहिती घेतली असता याबाबत माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता शिवदास पाटील यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत पाटील करीत आहे.

Protected Content