जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते सिंधी कॉलनी रस्त्यावर लावलेली एसटी कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, युवराज वसंतराव सावळे (वय-४८) रा. एस.टी.क्वाटर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते एसटी महामंडळात नोकरीला आहे. शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणी चौक ते सिंधी कॉलनी रस्त्यावरील सार्वजनिक जागेवर त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एवाय ९९१७ ) ही पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवराज सावळे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदिप पाटील करीत आहे.