Home क्राईम धारदार चॉपर घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला अटक

धारदार चॉपर घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला अटक


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या उड्डाणपूला खाली बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या संशयित तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अटक केली आहे.  याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या उड्डाण पुलाखाली एक तरुण हातात लोखंडी धारदार चॉपर घेऊन परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण जैतकर यांनी कारवाई करत गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी शेख कासिम शेख सलीम (वय-२२) रा. पापा नगर, भुसावळ याला अटक केली. त्याच्याकडून ११ इंची लांबीचा धारदार चॉपर हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख कासिम शेख सलीम याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण जैतकर करीत आहे.


Protected Content

Play sound