Home क्राईम धरणगावातील काँग्रेस पक्षाच्या कार्याक्रमात चोरी; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

धरणगावातील काँग्रेस पक्षाच्या कार्याक्रमात चोरी; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात एका तरूण कार्यकर्त्याच्या खिशातून मोबाईल आणि रोकड असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आलेले होते. त्यावेळी प्रमोद श्रीराम जगताप (वय-३९) रा. बांभोरी ता. धरणगाव हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले होते. कार्यकर्त्यांची गर्दी झालेली असताना प्रमोद जगताप यांच्या खिशातून मोबाईल व रोकड असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संशयित आरोपी अरबाज सलीम शहा फकीर (वय-१८) आणि हुसेन शेख भिकन शेख (वय-१८) दोन्ही राहणार धुळे यांनी चोरून येण्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते प्रमोद जगताप यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रामदास पावरा करीत आहे.


Protected Content

Play sound