भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहराजवळील तापीनदीत विसर्जन केलेल्या मुर्त्यांच्या बांबू काढण्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय मुलाला दोन जणांकडून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, योगेश सुरेश मोरे वय-१७ रा. नागसेन नगर, कंडारी ता.भुसावळ हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ शहराजवळील तापी नदीत विसर्जन करण्यात आलेल्या देवीच्या मुर्त्यांचे बांबू काढण्यासाठी योगेश मोरे हा गेला होता.
त्यावेळी शिवा दिपक तायडे आणि दिपक वंसत तायडे दोन्ही रा. कंडारी ता.भुसावळ यांनी योगेश मोरे याला शिवीगाळ केली. त्यानंतर तेथील लाकडी बांबूने योगेशला मारहाण केली करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, योगेश मोरे याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्ररीवरून मारहाण करणारे शिवा तायडे आणि दिपक तायडे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास बाविस्कर करीत आहे.